Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
वय लहान, कर्तृत्त्व महान

डॉ. निलिमा यांचे सुरवातीचे शिक्षण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत झाले. परिस्थिती नसताना स्वबळावर शिकायचे ही जिद्द होती. त्या जोरावर त्या शिकत गेल्या. इच्छा आणि बुद्धिमत्ता असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. इच्छाशक्ती असेल, तर चांगली माणसे मिळत जातात आणि सगळे साध्य होत जाते. सध्या पीएचडीसाठी संशोधन सुरू असले, तरीही डॉ. निलिमा त्याच इच्छाशक्ती आणि जिद्दीने शिकताहेत. डॉक्टर व्हायची निलिमा यांची स्वतःची इच्छा होती. त्यासाठी आजीआजोबांकडून प्रोत्साहन मिळत होते. त्याच आधारावर बीएएमएस पूर्ण केले आणि पुढे प्रॅक्टिस सुरू केली. डॉ. समीर जमदग्नी हे त्यांचे आयुर्वेदाचे गुरु. दुसरे एक वडिलधारे डॉ. सदानंद सरदेशमुख. त्यांचे कॅन्सरचे हॉस्पिटल होते. तिथे ईएनटीशी संबंधित कॅन्सरचे निदान करण्याचे काम त्यांनी दिले होते. त्यासाठी प्रत्येक बुधवारी निलिमा त्यांच्या हॉस्पिटलला जात असत. त्याचे त्यांना पाचशे रूपये मिळत. अशा रितीने त्यांच्याशी डॉ. निलिमा यांची नाळ जोडली गेली. सर्जिकलला डॉ. अविनाश वाचासुंदर हे गुरू लाभले. डॉ. जमदग्नी तर त्यांना आरंभशूर म्हणतात.
डॉ. निलिमा यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. 2000 साली त्यांना रस्त्यावर मोठा अपघात झाला. त्यामुळे 21 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. त्या उपचारांनंतर एपिलेप्सीचा आजार जडला. सुमारे 20 वर्षांपासून त्यासाठीच्या गोळ्या नेमाने घेत आहे. प्रॅक्टीस बंद करा, सर्जरी बंद करा असा सल्लाही अनेकांनी दिला. पण निलिमा थांबल्या नाहीत. दरम्यानच्या काळात काही शैक्षणिक संस्थांशी संबंध आला. त्यातून कॉलेजमध्ये लेक्चरर, प्रोफेसर, रीडर अशा शैक्षणिक पदांवर काम करत राहिल्या. सध्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि एचओडी म्हणून कार्यरत आहेत. तिथल्या बोर्ड ऑफ स्टडीजवरही त्या आहेत.
दुबईतलाही एक टप्पा आयुष्यात आला. दुबईला जाऊन आयुर्वेदिक प्रॅक्टिसाठीची तिथली परीक्षा दिली आणि लायसन्स मिळवले. तिथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस अत्यंत प्युअर आहे. पण त्यांचा ओढा हा सर्जिकलकडे होता. त्याही परिस्थितीत तिथे 10 वर्षे प्रॅक्टिस केली. दुबईत प्रॅक्टिस करण्याचे लायसन्स त्यांच्याकडे आजही आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये त्यांनी एमबीएही केले. वैद्य हरिश पाटणकर दुबईला एका कॉन्फरन्ससाठी आले होते. तिथे पोस्टर प्रेझेंटेशनची स्पर्धा होती. त्यात त्यांचीही पोस्टर्स होती आणि डॉ. निलिमा या परीक्षक होत्या. त्यावेळी पहिल्यांदा पाटणकर सरांशी भेट झाली. डॉ. निलिमा या पूर्वाश्रमीच्या पाटणकर असल्यामुळे पाटणकरांशी अनौपचारिक चर्चा केली. त्यांचे प्रेझेंटेशन त्यांना आवडले. दुबईतून काही काळाने भारतात यायचा विचार करत आहे, असे सांगितल्यावर पाटणकरांनी त्यांना भेटीचे आमंत्रण दिले. तेव्हा कॉस्मेटॉलॉजीच्या कोर्समधून आठ दिवसांत थोडक्यात तुम्हाला सगळे ज्ञान मिळू शकते आणि तुम्ही उत्तम प्रॅक्टिस करू शकता, असे पाटणकरांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी तो कोर्स केला.
केशायुर्वेद कॉन्फरन्सलाही त्या गेल्या. तरीही, ‘आपल्याला हे खरेच जमेल का’, अशी शंका त्यांच्या मनात होती. पाटणकरांनी एक फॉर्म्युलेशन दाखवले. त्यात स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार सगळे केले तर 60 टक्के सक्सेस नक्की मिळेल. बाकी 40 टक्के सक्सेस हे पेशंट, तुमचे स्कील यावर अवलंबून आहे, असे सांगितले यातून डॉ. निलिमा यांची खात्री पटली. स्त्री आणि सौंदर्य या दोन गोष्टी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ती आवड होतीच. त्यामुळे केशायुर्वेदची फ्रँचायजी घेतली. आता सर्जिकल, आयुर्वेद आणि ईएनटी, ऑप्थॅलमॉलॉजी आणि केशायुर्वेद याची प्रॅक्टिस डॉ. निलिमा करतात. केशायुर्वेद ही स्पेशलाईज्ड प्रॅक्टिस आहे असे डॉ. निलिमा यांचे मत आहे.
वैद्य पाटणकर वयाने लहान असले, तरी गुरुतुल्य आहेत. वयापेक्षा अधिक ज्ञान, चांगल्या हेतूने आणि लोकांपर्यंत प्रसार करण्यासाठी व्यक्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी यश मिळवले आहे. यातूनच त्यांचा निःस्वार्थीपणा दिसतो. फोन, वेबिनार यांच्याद्वारे तसेच फॉर्मुले तयार करून ते मार्गदर्शन करतात. वास्तविक त्यांच्या वयाचा मुलगा मला असला तरीही त्यांना गुरू मानायला आवडते. लोकसंग्रह, लोकशिक्षण आणि या सगळ्याचे डॉक्युमेंटेशन याचे उत्तम कौशल्य त्यांच्या अंगी आहे, अशी भावना डॉ. निलिमा व्यक्त करतात.
चिंचवडमध्ये अमृते हॉस्पिटल नावाने डॉ. निलिमा यांचे दहा खाटांचे हॉस्पिटल आहे. मोरया हॉस्पिटल या 100 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये त्या कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. केशायुर्वेदला उत्तम भविष्य आहे. फक्त काही गोष्टींकडे आणखी लक्ष द्यायला हवे. केशायुर्वेदच्या संदर्भात महिला पेशंट आनंदी आहेत. पण पुरुषांच्या बाबतीत विशेषतः टकलाच्या समस्येबाबत आपण थोडे कमी पडतोय, असे वाटते. या समस्येत गुंतागुंत असल्याने रिझल्ट लगेच मिळत नाही. यावर हेअर ट्रान्स्प्लांट हा एकमेव उपाय सध्यातरी आहे. पण तो सर्जिकल, रिस्की, टाईम कन्झ्युमिंग आणि प्रचंड खर्चिक आहे, असे परखड मतही त्या मांडतात. सर्व फ्रँचायजर्सना हँड्स ऑन ट्रेनिंग चांगले मिळते. वेबिनार अटेंड करणे सर्वांनाच जमते असे नाही. कारण त्याची वेळ सोयीस्कर नाही. तसेच कधीकधी सॉफ्टवेअर, इंटरनेटमधील अडथळ्यांमुळेही संवाद होत नाही. त्याऐवजी महिन्यातून एक दिवस मीटींग ठेवली तर जास्त सोयीस्कर ठरू शकेल, अशी सूचना डॉ. निलिमा करतात.
थायरॉइडची सर्जरी झालेली एक 56 वर्षांची महिला होती. तिचे केस जवळपास गेलेच होते. ती म्हणाली की, तुमचा बोर्ड वाचून मी इथे आले. माझे केस सुधारतील का? आता खूप पैसे खर्च झालेत. मी काही दिवसांनी केसांच्या ट्रीटमेंटसाठी तुमच्याकडे येईन. म्हणजे विविध वयोगटाच्या लोकांना ही सेवा हवी आहे, हे यातून सिद्ध होत असल्याचे त्या म्हणतात. बीटेक झालेला आणि एमएससाठी युएसला निघालेल्या एका मुलाला कोंड्याचा प्रचंड त्रास होता. तो तीन महिन्यांची औषधे सोबत घेऊन गेला. त्याची कोंड्याची समस्या दूर झाली. त्यामुळे मुलाच्या आईने त्या मुलाची बहीण आणि अन्य अनेक पेशंट माझ्याकडे पाठवले. ही माझ्यासाठी एक प्राईझ विनिंग केस होती, असा अनुभव डॉ. निलिमा सांगतात.

Organization Details

नाव : डॉ. निलिमा संकेत अमृते
शिक्षण : बीएएमएस, एमएस, डीओआरएल, एमबीए (हॉस्पिटल मॅनेजमेंट), पीएचडी
क्लिनिकचे नाव : अमृते हॉस्पिटल
पत्ता : चिंचवड, पुणे.
मोबाईल : 7498320485
ईमेल : [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये -1992
केशायुर्वेद फ्रँचायजी : 2018

 

Our Specialities

  • One stop solution for all your hair and skin problem.
  • Accurate diagnosis and perfect treatment.
  • Complete Scalp Analysis, Photography, Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient ) and HP (Hair Prakruti )
  • analysis.Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s, Cosmetologist’s, Trichologist’s.
  • Wide range of hair and skin care herbal products.